Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

माष्टी येथील बौद्ध समाजावरील दाखल केलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू – सुरेश दादा गायकवाड

रघुनाथ सोनकांबळे……..

माष्टी येथे प्रथमच भीम जयंती साजरी केल्याने जातीवाद्याकडून बौध्द वस्तीवर हल्ला करण्यात आला.बौध्दा समाजातील व्यक्तीवरच क्रॉस केस व गंभीर गुन्हे दाखल दाखल झाल्याची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी माष्टी येथील बौध्द समाज व पीडित कुटुंबाची भेट घेऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली
Img 20260513 Wa0025
Img 20260513 Wa0025
आष्टी येथील बौध्दावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. पिण्याचे पाणी देत नाहीत. पिठाची गिरणीवर दळून देत नाहीत दुकानात साहित्य देत नाहीत राशन देत नाहीत गावातून बाहेर जाण्यासाठी ये जा करणाऱ्या ऑटोमध्ये बसू देत नाहीत व पीडितावरच क्रॉस केस करून गंभीर गुन्हे दाखल केल्याने केल्याची माहिती पीडित कुटुंबाने दिली.
आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेश गायकवाड यांनी धर्माबाद येथील तहसीलदार स्वामी मॅडम यांची भेट घेऊन गावावर बहिष्कार टाकला असता अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी या लोकांना देत नाहीत तुम्ही गावात जाऊन भेट घेऊन तुम्ही यावर काय उपाय योजना केलात तुम्ही तेथे आरोपींनाच सहकार्य करत आहात का असा सवाल सुरेश दादा गायकवाड यांनी धर्माबाद येथील तहसीलदार स्वामी मॅडम यांना विचारले असता यावर तहसीलदार मॅडम यांना काही उत्तर देता आले नाही.
अन्याय पीडित कुटुंबावरच क्रॉस केस व गंभीर गुन्हे दाखल केल्याने माष्टी अंतर्गत येणारे कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे जाऊन सुरेश दादा गायकवाड यांनी तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांची भेट घेऊन धारेवर धरले ज्या समाजावर अन्याय झाला त्याच समाजावर तुम्ही उलट क्रॉस केस कोणाच्या सांगण्यावरून केलात तुम्ही सुद्धा त्यामध्ये जबाबदार आहात आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहात. बौद्ध समाजावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश दादा गायकवाड यांनी दिला.
Img 20260513 Wa0023
Img 20260513 Wa0023
यावेळी आंबेडकरवादी लोक मंच चे नंदकुमार बनसोडे, भास्कर भेदेकर, जे.पी. मिसाळे , जयपाल वाघमारे तसेच स्थानिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button