Latest Newsआपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 06 व 08 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

प्रेस नोट
रघुनाथ सोनकांबळे…
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 06 व 08 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.
दिनांक 06 व 08 ऑक्टोबर 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. यासाठी सोबतची प्रेस नोट वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी.

या गोष्टी करा :
१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.



