Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
शहीद पोचीराम कांबळेच्या पराक्रमाची जाण समाजाला असावी,रविंद्र भालेराव

रघुनाथ सोनकांबळे…………
नामांतर लढ्यामधील महान योद्धा शहीद पोचिराम कांबळे यांची समाजाप्रती निष्ठा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी नसानसात भरलेला स्वाभिमान किती जाज्वल्य होता हा इतिहास आपल्यापुढे असताना त्यांच्या पराक्रमाची जाण समाजातील तरुण युवकांना असावी असे प्रखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव यांनी अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.
नायगाव तालुक्यातील मौजे टेंभुर्णी येथे शहीद पोचीराम कांबळे यांच्या जन्मस्थानी सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी दिग्दर्शक भीमपुत्र टेक्सास गायकवाड कोल्हापूर,सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष डी एस नरसिंगे,मानवी हक्क अभियानचे नेते मच्छिंद्र गवाले, लसाकामचे नरसिंग घोडके, पत्रकार माधव बैलकवाड,अँड सूर्यवंशी, मंगलाताई कांबळे, डॉक्टर उत्तम कांबळे,डॉक्टर उत्तम इंगोले,टेंभुर्णीचे पोलीस पाटील सतार पठाण व शहीद पोचीराम कांबळे यांचे वीरपुत्र बाबुराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.




