Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव शहराला पुराने वेढले तर अनेक नगरातील नागरिकांचा रस्त्याविना संपर्क तुटला रस्त्यावर वहाते तीन ते चार फूट पाणी…

रघुनाथ सोनकांबळे….
नायगाव व परिसरात गेल्या 24 तासापासून धो धो पाऊस सुरू असून नायगाव शहरातील सखल भागातील नगरात पाणीच पाणी साचल्याने अक्षरशा या शहराला मोठ्या तलावाचे रूप आल्याचे चित्र दिसत आहे.

या ढगफुटी सदृश्य पुराणे अनेकांचे संसार पुरात वाहून नेले आहे . जर असाच पाऊस पुढे चालू राहिला तर मोठी गंभीर परिस्थिती या शहरात उद्भवू शकते अशी भीती नागरिकात व्यक्त होत आहे. या पूर परिस्थितीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नागरिकांना धिर देण्याचा प्रयत्न करीत आहेत .

नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा या शहराचे भूमिपुत्र रवींद्र पाटील चव्हाण हे देखील नायगाव शहरासह या परिसरातील पूर परिस्थिती पाहणे करून या पुरांमधील झालेल्या नुकसानीची सध्या परिस्थितीती पाहून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

अशा गंभीर परिस्थितीत महसूल विभागाचे संबंधित कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी आपापल्या हेडकॉटरला व गावातील ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहून त्या त्या गावचा आढावा घेण्याच्या सूचनाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.




