Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव शहरातील बहुचर्चित गैर शेती जमिनीवर खोट्या नोंदी केल्याचे उघड …महसूल कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी..

नायगाव विशेष प्रतिनिधी…. –
नायगाव शहरातील गट क्रमांक 418, सर्वे नंबर 128 सी ही जमीन सन 1967 पासून आजपर्यंत नॉन-अॅग्रिकल्चरल (गैरशेती) म्हणून नोंद असून, त्या ठिकाणी सन 1968 नंतर त्या जमिनीवर नांदेड जिल्हा खरेदी विक्री संघाचे दोन गोदामाचे बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी कधीही शेती करण्यात आलेली नाही, तसेच कोणतेही पीक घेतलेले नाही, अशी माहिती महसूल नोंदीवरून समोर आली आहे.
तथापि, नायगाव येथील तत्कालीन तलाठ्यांनी सन 2021 व 2022-23 या कालावधीत या गैरशेती जमिनीवर हळद व गहू , असल्याचे खोटे पीक पेऱ्याचे प्रमाणपत्र व कृषी पंप असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा खरेदी विक्री संघ नांदेड यांना दिले असल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात भीमशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना आज (दि. 27 ऑक्टोबर 2025) लेखी तक्रार देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोन्ही तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.
सोनकांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, सदर जमिनीचे 1967 पासून 2023 पर्यंतचे नॉन-अॅग्रिकल्चरल दस्तऐवज, सातबारा उतारा व त्यावरील गोदामाचा उल्लेख तपासल्याशिवाय खोटे पीक प्रमाणपत्र देण्यात आले, ही गंभीर बाब असून शासनाची फसवणूक केल्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी.
कोट्यावधीची उलाढाल झालेल्या नायगाव शहरातील बस स्थानक परिसरातील गट क्रमांक 418 सर्वे नंबर 128 सी ही जमीन सन 1967 पासून नॉन अग्रिकल्चरल गैर शेती ची महसूल विभागीय नोंद असून त्या ठिकाणी सन 1968 च्या नंतर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या दोन भव्य गोदामाचे बांधकाम करण्यात आले या ठिकाणी कधीच शेती करण्यात आली नाही अशीच माहिती महसूल विभागाच्या नोंदीवरून उघडकीस आली असताना महसूल कर्मचाऱ्यांनी व भूखंड माफिया च्या संदर्भाताने बनावट कागदपत्रे तयार करून शेकडो कोटीची जमीन हडप करून त्यावर आज मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असल्याचे दिसत आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी जनतेतून होत आहे.



