Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
जिओ नेटवर्क बंद पडल्याने नायगाव परिसरातील ग्राहक त्रस्त नेटवर्क समस्या कायम; ग्राहकांचा संताप उसळला

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव…
नायगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जिओ नेटवर्क वारंवार खंडित होत असल्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. कोणतेही वेबसाईट उघडत नाही, कॉल वारंवार कट होतात, तसेच इंटरनेट सेवा बंद होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे तसेच व्यावसायिकांचे कामकाज ठप्प झाले आहे.
या सततच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन काम करणारे विद्यार्थी, दुकानदार, तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोबाईल शॉपीधारकांनी सांगितले की, ग्राहकांकडून नेटवर्कबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, मात्र जिओ कंपनीचे अधिकारी याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत.



