Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
कहाळ्यात २१ वर्षांची परंपरा कायम चंपाषष्ठीनिमित्त कीर्तन उत्सवाचे दिव्य आयोजन

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव… – नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कहाळा (बु.) येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज संस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली तब्बल २१ वर्षे सातत्याने सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रमुख कीर्तनकारांचा सहभाग असणार आहे. २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

२१ नोव्हेंबरला हभप अनिरुद्ध महाराज बान्हाळीकर, २२ नोव्हेंबरला हभप राजेश महाराज गुंजर्गेकर, २३ ला हभप मधुसूदन महाराज कापसीकर, २४ ला हभप वासुदेव महाराज कोलंबीकर यांचे कीर्तन होईल. २५ नोव्हेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हभप महंत समाधान महाराज भोजेकर यांचा सहभाग असेल.
२६ नोव्हेंबरला हभप सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन व दुपारी चंपाषष्ठी निमित्त तळी उचलण्याचा कार्यक्रम होईल. २७ नोव्हेंबरला हभप ज्ञानेश्वर महाराज कंधारकर कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतील.

कीर्तन महोत्सवात मृदंगाचार्य विश्वेश्वर महाराज कोलंबीकर, गायनाचार्य विष्णू महाराज तांदळीकर, गायक शाम देसाई नरगंलकर, रावसाहेब पाटील रुईकर, बबलु वाकेकर, सुभाष पाटील वाकेकर, मारोती पाटील, पोलीस पाटील संतोष कहाळेकर, बालाजी पाटील हिंदोळा, चांदबा पाटील करमाळा, शरद पाटील कोलंबी, बाबू पांचाळ घुंगराळा यांच्यासह कहाळा येथील भजनी मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.



