Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली
खतगाव येथील रांगोळीकार शिवाजी पेटेकर यांच्या रांगोळीचे सर्वत्र कौतुक

रघुनाथ सोनकांबळे..
भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी हे मांगल्याचे प्रतिक मानलं जातं. रांगोळी हा महिलांचा प्रांत पण हल्ली रांगोळी हा कलाप्रकार स्त्रियापुरतं मर्यादित न राहता अनेक पुरुषांनी देखील रांगोळी या कलेमध्ये प्राण्याने मिळवून या कलेमध्ये भर घातली.असेच खतगाव ता.बिलोली येथील रहिवाशी आणि शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा ता. किनवट जिल्हा नांदेड येथे कार्यरत असलेले शिवाजी पेटेकर खतगावकर यांनी रांगोळी या कलाप्रकारामध्ये विशेष प्राविन्य मिळवले. त्यांच्या अनेक रांगोळ्या पैकी नुकत्याच गोकुळाष्टमीनिमित्त काढलेल्या बालकृष्णाची रांगोळी ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली.




