नायगाव तालुक्यातील कुंटूर तांडा येथे संत श्री सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती उत्साहात साजरी

मिरवणूक कीर्तन व पारंपारिक, पोशाख परिधान,लोकगीताने जयंती साजरी..
कुंटूर वार्ताहर..दि..(१५)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे कुंटूर तांडा येथे मोठ्या संख्येने बंजारा समाज एकत्र वस्ती करून आहे. कोणी कोणापेक्षा कमी नाही. कोणाला भजत पुजत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा कर्म करायला शिका अशी थोर मानवतावादी शिकवण देणाऱ्या संत सेवालाल महाराजांची 286 वी जयंती मोठ्या उत्साहात कुंटूर तांडा येथे साजरी करण्यात आली .
सकाळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली .व प्रथम खीरदान अन्नदान करून गावातील सर्व नागरिक महिला पुरुषांनी या अन्नदानाचा लाभ घेतला. नंतर सर्व बंजारा समाजातील महिला पुरुष यांनी पारंपारिक वेशभूषांमध्ये गीत गायन केले. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्याने कुंटूर तांडा येथून संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पालखी व मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला . यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच संत सेवालाल महाराज मंदिर चे पुजारी श्री सखाराम महाराज हे उपस्थित होते . यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पारंपारिक पोशाख परिधान करून लोकगीताने गायन व नृत्य सादर केले.

यावेळी सखाराम महाराज पुजारी कुंटूर तांडा ,मोहन पवार, रामराव पवार, भोपाजी पवार, उत्तम राठोड ,जीवन राठोड ,विजय चव्हाण ,अंकुश पवार ,विलास राठोड, नंदाताई पवार, प्रियंका पंडित ,कविता राठोड ,बालाजी पवार ,विलास पवार ,अनिल पवार ,बळवंत पवार ,अशोक जाधव, गोविंद कंडक्टर ,गोविंद राठोड, दिगंबर पवार, शिवाजी जाधव ,शेषाबाई जाधव ,शोभाबाई राठोड, नंदाताई दिलीप ,राणा प्रताप पवार, बळवंत जाधव, शिलाबाई जाधव ,अंकुश रंगराव पवार, मोठ्या संख्येने महिला पुरुष व तरुण मंडळी उपस्थित होते.
.



