Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
ओव्हरटेकच्या नादात ट्रॅव्हल्सने ट्रकला दिली धडक .. वीस प्रवासी बाल बाल बचावले..

सिद्धार्थ गजभारे ..कुंटूर प्रतिनिधी ..
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे पळसगाव पाटी येथे दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनी नांदेड कडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने ट्रॅक ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्स चे सर्व काचे फुटून गेले आहेत. त्यामध्ये एकूण 20 प्रवासी महिला पुरुष लेकरं असे होते . त्यामध्ये 7 प्रवाशांच्या डोक्याला हाताला पायाला मार लागला असून जीवित हानी मात्र झाली नाही. मात्र प्रवाशी बाल बाल बचावले असल्याची माहिती ही यावेळी ट्रॅव्हल्समधील प्रवास यांनी दिली आहे. सुसाट वेगाने हरण वाजून नागरिकांना परेशान करून ट्रॅव्हल्स वाले दररोज चढाओढ करून जास्तीत जास्त प्रवासी आपल्यालाच मिळावे अशा धुंदीमध्ये समोर येणाऱ्या गाडींना वर टॅग करणे हे याचा रोजचा धंदा झाला असल्याचेही यावेळी नागरिकांनी सांगितले . त्यामुळे नांदेड वरून देगलूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स देगाव पाटी पासून काही अंतरावर पळसगाव फाट्याच्या चौकामध्ये आले असता नायगाव कडून एक ट्रक पळसगाव कडे जात असताना अर्धा ट्रक समोर ला पास झाल्यानंतर पाठीमागच्या साईटला जोरदार येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने धडक दिली व जागेवर सर्व गाडीचे काचा फुटून सर्वांना एकमेकांना धडक झाले असून सात प्रवाशांच्या चेहऱ्याला व मार लागला आहे . त्यातच ड्रायव्हर व किनर यांनाही मार लागला असल्याची माहिती ही पोलीस बीट प्रमुख कंधारे यांनी दिली आहे. यावेळी प्रवासी सर्व भयभीत झाले होते. महिला नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यामुळे कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देगाव ते वजिरगाव फाटा व या महामार्गाव, नांदेड हैदराबाद महामार्गावर दररोज अवैध प्रवासी वाहतूक असणारे ट्रॅव्हल्स जोरदार हरण वाजून प्रवाशी जास्तीत जास्त मिळावे म्हणून चडा ओढ करण्याचे नादात लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.




