घुंगराळा म्हाळसाकांत यात्रेतील पशु व कृषी प्रदर्शनाचे अविनाश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न…!

नायगाव ता प्रतिनिधी
नायगाव खै…तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर पशु प व कृषी प्रदर्शन त्याच बरोबर आकर्षक घोड्याचे ही प्रदर्शन भरण्यात आले होते. या यात्रेच्या विशेष कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील श्रीक्षेत्र माळसाकांत यात्रे निमित्ताने कृषी व पशु प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शि. सभापती शिवराज पाटील होटाळकर. नांदेड जिल्हाचे पोलीस अबिनाश कुमार यांच्यासह राजेश कुंटूरकर चेअरमन शुगर कारखाना कुंटूर, बालाजी बच्चेवार मा. जि. प. स. गावचे सरपंच वसंत सहगावे यांच्या सह
रवींद्र पाटील भिलवंडे शिवसेना, सूर्याजी चाडकर कुंटूर, डॉ शिवाजीराव कागडे अंजन हॉस्पिटल नायगाव, नितीन हिवरे, अनिल जोंधळे, जी एस खिल्लारे , विश्वनाथ बडूरे, एस पी उदगिरे ,पाटील निरीक्षण देवरे , सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील कुंटूर ,आदी मान्यवर आणि परीसरातील व गावातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमात पत्रकाराच्या वतीने जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी पत्रकार रामप्रसाद चन्नावार, माधव पवार. हणमंत चंदनकर. शिवाजी पांचाळ हे उपस्थितीत होते.


