Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पा.सुगावे यांची मागणी वाहतूक नितंत्रकाने मान्य केली..

घुंगराळा येथे सर्व एस. टी. बसेसना थांबा मिळाला.

नायगाव.. रघुनाथ सोनकांबळे…दि..(८)

येथील सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पा.सुगावे यांनी घुंगराळा येथे जलद,व अतिजलद बस थांबावाव्यात अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .याबाबत राज्य परिवहन महामंडळ ,जिल्हाधिकारी, नायगाव तहसीलदार, बिलोली, मुखेड,देगलूर, नांदेड या सर्व बसस्थानक आगारप्रमुख यांना घुंगराळा येथे थांबा मिळावा याबाबत निवेदन दिले होते.

यावर राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत घुंगराळा येथे सर्व गाड्यांना थांबा देण्याबाबत आदेश काढून व्यंकटराव पा. सुगावे यांची मागणी मान्य केली.सर्व गाड्यांना थांबा मिळाल्याबद्दल घुंगराळा येथील गावकऱ्यांनी व परिसरातील इतर गावाच्या नागरिक, विद्यार्थी यांनी राज्य परिवहन महामंडळाचे व व्यंकटराव पा. सुगावे यांचे आभार मानून अभिनंदन केले.

 

img 20250208 wa0028
img 20250208 wa0028

वाहतूक नियत्रकाच्या पत्राला वाहक -चालकाची केराची टोपली..हींगोली मुखेडं बस विनंती करून ही नाही थांबली

या बाबद अधिकचे वृत्त असे की,दिनांक ७ फेबुरवारी रोजी हिंगोली नांदेड मुखेड ही बस कृ.एम एच २० बी एल २०३३ नांदेड आगरात आली असता यातील वाहक यांनी घुंग्राला येथे उतरणाऱ्या प्रवासी गजानन कदम रा.वंजारवाडी यांनी वाहक
माधुरी फुके याना सदरचे वाहतूक नियंत्रक यांचे पत्र मोबाईल वर दाखवल्या नंतर ही पत्र वैगेरे काही मी पाहात नाही गाडीतून खाली उतरा म्हणून बेल वाजवून आपमानीत केले..प्रवास्यानी गया वया केली तरी मान्य केले नाही.

screenshot 20250208 213241 youtube
screenshot 20250208 213241 youtube

शेवटी त्यांनी नायगाव चे तिकीट काढून नायगाव जाण्याचे ठरवले.पुन्हा तिकीट जरी नायगाव चे तिकीट काढले तरी घुंगराळा येथे उतरण्या साठी पुन्हा विनंती केली. तरी आर्वाच्य शिव्या देत फूके यांनी आपमनीत केले.हे सहन न झाल्याने पाठपुरावा करीत पत्र प्राप्त झालेल्या सूगावे याना संपर्क करीत प्रवासी यांनी फुकें मॅडम यांच्याशी संपर्क करून दीला असता त्यांनी चिडून जाउन परत त्यांना जोराने बोलत तुमच्या त्या तक्रार धारक व्यक्ती ला आम्हाला त्रास धारक ठरणाऱ्या वाढीव तिकिटाचे एक रुपया कमी करायला लावा म्हणत जोर जोऱ्याने गर्दा केला. सुगावे व कदम यांचा क्रमांक घेऊन चालक वाहक सघटनेच्या ग्रुप वर टाकून या व्यक्तीला सर्वांनी फोन लावा म्हणत तारतम्य नसलेली भाषा वापरली.
हा वाद जवळ तास पाऊण तास चालला. या ठिकाणी बस मध्ये असलेल्या प्रवाशी यांनी वाहक मॅडम याना आदराने बोलत थांबा व तिकीट वाढीचा काही संबंध नसल्याचे सांगून ही ऐकत नसल्याने  गाडीतील प्रवासी पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी डेपो मॅनेजर याना फोन लावला व घुंगराळा येथे बस थांबवून प्रवासी उतरविले.

screenshot 20250208 213248 youtube
screenshot 20250208 213248 youtube

वाहक माधुरी फुके यांच्या बोलण्याने आनेक प्रवासी आपमानित झाले असून अनेकांनी मोबाईल मध्ये हे सर्व चित्रित केले आहे. आगार प्रमुख व जिल्हा वाहतूक नियंत्रक यांच्या कडे रीतसर तक्रार केली असून अश्या आरेराविने बोलणाऱ्या वाहक फूके यांना दंड आकारून कार्यवाही करण्याची मागणी बसमधील प्रवाशांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button