Latest Newsआपला जिल्हामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आंबेडकरी समाजाचा वाढता विश्वास; पदाधिकाऱ्यांना बळकटी देण्याची मागणी.

रघुनाथ सोनकांबळे…….

मुंबई : शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन, मुंबई येथे आज शिवसेना अनुसूचित जाती सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सर्व जिल्हाप्रमुखांची जिल्हानिहाय आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीस शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे, सहसचिव पलांडे साहेब, शेलार साहेब तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख व माजी आमदार राम पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनुसूचित जाती सामाजिक न्याय विभाग नांदेड जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी आपल्या मनोगतात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना सामाजिक न्याय विभाग स्वतःकडे ठेवून अनेक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचे काम करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांची कामे मार्गी लागल्याने आंबेडकरी समाजातील विचारवंत, युवक, युवती व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यापुढील काळात अनुसूचित जाती सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांना विविध शासकीय समित्यांमध्ये संधी देण्यात यावी तसेच त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक सामाजिक कामे करून संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी भावना मंगेश कदम यांनी व्यक्त केली.

बैठकीत संघटनात्मक विस्तार, सामाजिक न्याय विभागाच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली असून राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी विभाग अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button